Desi Jugaad Video | मित्रांनो आपल्या भारताला जरी कृषीप्रधान देश असे म्हटले असले. तरी आजकाल शेती करणे ही शेतकऱ्यांसाठी खूप अवघड काम झालेले आहे. मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात. नांगरणी, पेरणीबियाणाला योग्य पद्धतीने पाणी द्यावे लागते. तेव्हा कुठे जाऊन पीक तयार होते. बरं त्या पिकाला चांगला भाव देखील मिळत नाही. या सगळ्या सोबत रानातली पाखरे देखील पिकाला खूप नुकसान पोहोचवतात. आणि बरेचशे पीक खातात या पक्षांना रोखण्यासाठी अनेक वेगवेगळ्या टेक्निक वापरल्या जातात.
परंतु पक्षी काही पिच्छा सोडत नाही. ते वेगवेगळे मार्ग काढून शेतातील पीक खाण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता या पक्षांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांना एक भन्नाट मार्ग शोधून काढला आहे. मक्याच्या कंसांवर त्यांनी अशी काही गोष्ट लावली आहे. ज्यामुळे कोणालाच मक्याचे कणीस खाता येणार नाही.
हेही वाचा- Hottest chilli Of World | ‘या’ आहेत जगातील ५ सर्वात तिखट मिर्ची, स्पर्श करायला देखील घाबरतात लोक
शेतकऱ्यांनी नेमके काय केले | Desi Jugaad Video
पक्ष्यांना पळवण्याचा प्रयत्न केला तरी ते जात नाहीत. दुसऱ्या ठिकाणी उडून जातात. परंतु लगेच ते पीक खाण्यासाठी येतात. यावर तोडगा म्हणून एका शेतकऱ्याने प्रत्येक कंसावर सुरक्षा कवच लावले आहे. त्यांनी प्रत्येक कंसावर प्लास्टिकची बाटली लावली आहे. त्यामुळे आता पक्षांनाही बाटली फोडून दाते खाता येणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 16 लाखांपेक्षाही जास्त वेळ आलेले आहेत. अनेकांना शेतकऱ्यांनी केलेले हे जुगाड खूपच आवडले आहे