राजस्थानमध्ये सध्या पुष्कर येथे आंतरराष्ट्रीय पशु मेळावा चालू आहे. या मेळ्यामध्ये विविध प्राणी सहभागी झाले आहेत. जे त्यांच्या ताकदीसाठी लोकप्रिय आहेत. यामध्ये एक म्हैस पुष्कर मेळाव्यात आलेली आहे. जी खूप लोकप्रिय आहे आणि तिला पाहण्यासाठी अगदी परदेशी पर्यटक देखील या मेळाव्यात सामील होत आहेत.
म्हशीची बोली लागली अकरा करोड | Pushkar Anmol Buffalo
या म्हशीचे नाव अनमोल असे आहे. या म्हशीला आतापर्यंत अकरा कोटी रुपयांची बोली लागली आहे. या म्हशीपासून आत्तापर्यंत जवळपास दीडशे म्हशींचे बछडे तयार झाले आहेत. नुकतेच हरियाणा येथे भरलेल्या या जत्रेत मशीनची किंमत सुमारे दोन कोटी रुपये होती. त्याची एकूण लांबी तीन फूट असल्याचे देखील सांगितले जात आहे.
या म्हशीला पाहून विदेशी पर्यटक हैराण
या म्हशीला पाहण्यासाठी देश परदेशातून लोक देखील येत आहेत. स्पेनवरून पुष्कर मेळाव्यात आलेला या विदेशी पर्यटकाला ही म्हैस पाहून आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी सांगितले की, त्यांनी या आदिवासी म्हैस कधीच पाहिलेली नाहीये.
बहादूर नावाच्या म्हशीची देखील चर्चा
अनमोल प्रमाणेच बहादूर नावाच्या म्हशीची देखील या जत्रेत खूप चर्चा चालू आहे या म्हशीची बोली एक कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे. या म्हशीची खास गोष्ट म्हणजे ती दररोज दहा लिटर दूध पिते. सोबत असतील खायला फळे लागतात यात सफरचंद हे तिचे आवडते फळ आहे.