Donkey Farming | आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजकाल अनेकजण गाई म्हशीचा व्यवसाय करून भरघोस उत्पन्न घेत आहेत. एक तरुण तर यातून सात हजार रुपये लिटरने दूध विकतो. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल परंतु गुजरातमधील पाटण येथील शेतकरी धीरेन सोलंकी हा गाढव पालनातून दूध व्यवसाय करत आहे. या दुधाला सात हजार रुपये लिटर एवढा भाव आहे. त्यापासून बनणाऱ्या दूध भुकटीला प्रतिक किलोसाठी सव्वा लाख पर्यंत दर मिळत आहे.
धीरण सोलंकी हे नोकरीसाठी प्रयत्न करत होते. परंतु नोकरीतून मिळणाऱ्या पगारात त्यांचा घर खर्चही भागत नव्हता. त्यामुळे त्यांनी एक नवीन असा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायाची सगळी माहिती घेतली आणि आठ महिन्यांपूर्वी त्यांनी गाढव पालन सुरू केले. यामध्ये त्यांनी तब्बल 22 लाखांची गुंतवणूक केली. आणि यात वीस गाढवांचे खरेदी केली जगात गाढविण्याचे दूध हे सर्वाधिक महान महाग मानले जाते. पहिले पाच महिने त्यांना यातून उत्पन्न मिळाले नाही.
हेही वाचा- Top 5 Agricultural Machines | भारतातील शेतीचे आधुनिकीकरण करणारी ‘ही’ आहेत ५ कृषी यंत्रे, वाढवतील नफा
किती मिळतो दर | Donkey Farming
धीरेन त्याचे दूध कर्नाटक केरळ या ठिकाणी पाठवतो. त्याचप्रमाणे सौंदर्यप्रसाधने निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये या दुधाला सर्वाधिक मागणी असते. त्याच प्रतिलिटर पाच ते सात हजार रुपयांचा दर मिळतो. इतकेच नाहीतर विदेशांमध्ये गाढविणीच्या दुधाच्या पावडरची किंमत एक ते दीड लाख रुपये एवढी आहे. हे दूध काढल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवले जाते आणि मागणीनुसार त्यांची पाठवणी केली जाते.
दूध किती मिळते
धीरेन यांच्याकडे आत्ता 42 गाढव असून आतापर्यंत त्यांनी 38 लाख रुपयांची गुंतवणूक या व्यवसायामध्ये केलेली आहे l. एका गाढवीनीपासून त्याला जरूर 800 मिली दूध मिळते. एकूण दूध विक्रीतून महिन्याला त्यांना दोन ते तीन लाख रुपयांचा नफा होतो. या व्यवसायासाठी त्याला सरकारकडून कोणताही अनुदान मिळालेले नाही. हे दूध अत्यंत पातळ आणि पांढरे शुभ्र असते. पाश्चिमात्य देशांमध्ये या दुधाला मोठी मागणी आहे.