Yavatmal Rain : यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; शेतकरी हतबल

Yavatmal Rain : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. दरम्यान यवतमाळ जिल्हा देखील मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे पिकाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे जे पीक आले आहे ते देखील पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभा राहील आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी अशी मागणी देखील अनेक शेतकरी करताना दिसत आहेत. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. राळेगाव, मेंगापूर, वाऱ्हा, बोरी, आष्टा या भागातील शेतात पाणीच पाणी झाल्याने अंदाजे 200 हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, तुरीचे पिक पाण्यात बुडाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Yavatmal Rain 🙂

नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई द्यावी

यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसापासून तुफान पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभा आहे. यामुळे आता लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी. असे अनेक शेतकरी मागणी करत आहेत. मात्र बऱ्याचदा मागणी करून देखील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.