Dhananjay Munde : धनंजय मुंडे कृषिमंत्री झाल्यापासून अनेक ठिकाणी दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. नुकताच त्यांनी बारामती दौरा केला. यावेळी त्यांनी बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठाणच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, व शैक्षणिक संकुल या ठिकाणी भेट दिली.
याबाबत बोलताना ते म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे लोकप्रिय आमदार मा.अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यातील कण्हेरी गावात कृषी विभागामार्फत उभारण्यात आलेली फळरोपवाटिका राज्यातच नव्हे तर सबंध देशात सुंदर व आदर्श आहे. आज या फळरोप वाटिकेस मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने बारामती तालुक्यात आयोजित आरोग्य वारी अभियान अंतर्गत अयोजित 100 कि.मी. रिले रन स्पर्धेच्या सांगता सोहळ्यासही उपस्थित राहिलो.
या दौऱ्यात बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठाणच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, व शैक्षणिक संकुल येथेही भेट देऊन प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात येत असलेल्या शेतीविषयक संशोधनाची माहिती घेतली. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रासही भेट दिली व तेथील उपक्रमांची माहिती घेतली.
अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत असलेले संशोधन याबाबत माहिती जाणून घेतली. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात शाश्वत शेती कशी करावी व कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवावे या दृष्टीने ही रोपवाटिका व कृषी विकास प्रतिष्ठाणचे कार्य आदर्शवत आहे. असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.