Ravikant Tupkar : मागच्या काही दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद चव्हाट्यात आला असून यामध्ये फूट पडण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांनी शिस्त पालन समिती बाबत काही आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. यानंतर त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी 15 ऑगस्टचा अल्टिमेट देण्यात आला होता. मात्र रविकांत तुपकर गैरहजर राहिल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांच्याबाबत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना (Self-respecting Farmers Association) नेमका कोणता निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मागच्या काही महिन्यापासून रविकांत तुपकर हे राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यांनी अनेक वेळा राजू शेट्टी यांच्यावर टीका देखील केली आहेत. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे देखील रविकांत तुपकर म्हणाले आहेत, त्यामुळे आता रविकांत तुपकर यांच्या मनात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
रविकांत तुपकर यांनी आपले म्हणणे माध्यमांसमोर न मांडता त्यांनी शिस्त पालन समोर समितीसमोर म्हणणे मांडावे. अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती. याबाबत मागच्या काही दिवसापूर्वी पुण्यात बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले होते. मात्र रविकांत तुपकर या बैठकीला गैरहजर होते त्यानंतर या बैठकीत रविकांत तुपकर यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंतचा कालावधी देण्यात आला होता.
रविकांत तुपकरांचं नेमकं म्हणणं काय ?
रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराज असल्याने ते इतर पक्षात जाणार का? अशा देखील चर्चा सुरू आहेत मात्र या चर्चांवर रविकांत तुपकर यांनी वेळीच पूर्णविराम दिलेला आहे. ते म्हणाले आहेत मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच काम करणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मांडली. त्यामुळे मी इतर पक्षात जाईल अशा अफवा कोणीही पसरू नये असे देखील तुपकर म्हणाले आहेत.