PM Kisan Yojana : सावधान ! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता

PM Kisan Yojana | मित्रांनो जर तुम्ही पीएम किसान या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला इकेवायसी करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे ज्या लोकांनी अजूनही केवायसी केले नाही. त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. तुम्ही सीएसटी केंद्रावर जाऊन तसेच पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन देखील केवायसी करू शकता.

सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्यांच्या अंतराने दोन दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 14 हप्ते जमा झालेले आहे.आणि नुकतेच सरकारने पंधराव्या हप्ताची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया देखील सुरुवात केली आहे. तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील याबद्दलची माहिती पाहू शकता.

इकेवायसी करणे गरजेचे

जर शेतकऱ्यांना पुढील हप्ता पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन केवायसी करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन तसेच पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन देखील केवायसी करू शकता. जर तुम्हीही केवायसी केलेली नाही तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्यापासून वंचित राहू शकता.

हेही वाचा –Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांचा अल्टिमेट संपला, स्वाभिमानी शेतकरी संघटना काय निर्णय घेणार?

यामुळे अडकला आहे पुढील हप्ता | PM Kisan Yojana

केवायसी व्यतिरिक्त आणि काही कारणामुळे पुढील हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. जसे की तुमचे लिंग, नावामध्ये चूक, आधार कार्ड नंबरमध्ये चूक या सगळ्या चुकांमुळे देखील पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नाही.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ

ज्या शेतकऱ्यांच्या घरात जो कोणी टॅक्स भरत असेल, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच पती किंवा पत्नी यांच्यातील कोणी देखील इन्कम टॅक्स भरला असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या लोकं या शेतीचा वापर कृषी काम सोडून इतर काही कामासाठी करत असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.