Agriculture Dryer Machine| ‘ही’ मशीन वाढवणार शेतकऱ्यांचा नफा, भाजीपाल्याची करता येणार साठवणूक

Agriculture Dryer Machine| मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे आता शेतकऱ्यांना ड्रायर मशीन हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. या मशीनद्वारे शेतकरी भाजी कापून एअर टाईट बॅगमध्ये भरून विकू शकतात. ही वीन मशीन ही भाज्या ड्राय करून पॅकिंग करण्याचे काम करेल.

आजकाल शेतकऱ्यांना भाज्यांच्या भावामध्ये खूप नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांकडे साठवण्याची क्षमता नसल्याने किंवा दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने, त्यांना त्यांच्या पिकांवर ट्रॅक्टर चालवावा लागतो. परंतु आता जी मशीन आली आहे. त्या मशीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे पीक नष्ट करावे लागणार नाही. तर ते त्यांना साठवून ठेवता येईल.

या ड्रायर मशीनचा वापर करून शेतकरी भाज्यांना कट करून ड्रायर मशीनच्या माध्यमातून ठेवून भाज्यांना चांगला रेट आल्यावर ते विकू शकतात. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या मशीनने भाज्यांच्या पोषण तत्त्वावर प्रभाव पडेल का? तसेच किती वेळा पुरता ही भाजी ड्राय केली जाईल? ही मशीन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे का या सगळ्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा- Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांचा अल्टिमेट संपला, स्वाभिमानी शेतकरी संघटना काय निर्णय घेणार?

मशीनचे प्रात्यक्षिक केले जाणार | Agriculture Dryer Machine

या मशीनच्या वापराआधी त्या मशीनचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. या मशीनमुळे भाज्यांचे उत्पादन चांगले राहत आहे का किंवा किती फायदा होणार आहे या सगळ्याच्या आकलन केले जाणार आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना याची माहिती दिली जाणार आहे. वेगवेगळ्या भाज्यांवर या मशीनचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे.

ड्रायर मशीन कशी काम करणार

या केंद्राचे विशेषतज्ञ डॉक्टर लवलेश यांनी सांगितले आहे की, याचे प्रात्यक्षिक अजून चालू केलेले नाही. कंपनीने फक्त या मशीनची माहिती दिलेली आहे. सगळ्यात आधी भाजीचे स्लाईस करून त्यात एका जाळीदार ट्रेमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर या मशीनला ऑन करून 45 डिग्री तापमानावर या भाज्या ठेवल्या जातील. त्यानंतर एक विशिष्ट वेळ निश्चित करून भाज्यांना बाहेर काढून एका पॉलिथिन मध्ये पॅक केले जाईल. आणि त्यानंतर मार्केटमध्ये ही भाजी सप्लाय केली जाईल.