PM Kisan Mandhan Yojana | सरकारतर्फे मिळणार दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन, जाणून घ्या योजनेची माहिती

PM Kisan Mandhan Yojana |आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच त्यांचे भविष्य देखील चांगल्या प्रकारे जावे यासाठी अनेक योजना आणलेले असतात. आता या संदर्भात अधिक अतिशय महत्त्वाची योजना सरकारने समोर आणली आहे. याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. सरकारच्या या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या या योजनेचे नाव आहे पीएम किसान मानधन योजना असे आहे. तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

तुम्ही जर या योजनेत गुंतवणूक केली तर शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन सरकार मार्फत दिले जाणार आहेत. यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दर महिन्याला 55 ते 200 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यानंतर साठ वर्षे झाल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

जर शेतकरी बांधवाचा मृत्यू झाला, तर शेतकऱ्याच्या जोडीदाराला पीएम किसान मानधन योजनेंतर्गत पेन्शनच्या 50% मिळण्याचा हक्क असेल. कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदाराला लागू आहे आणि मुले त्याचे लाभार्थी नसतील.

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

18 ते 40 वयोगटातील शेतकरी एम किसान मानधन योजनेचा (PMKMY) लाभ घेऊ शकतात. यामध्ये, तुम्ही तुमच्या वयानुसार दर महिन्याला योगदान दिल्यास, वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला मासिक 3,000 रुपये किंवा वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळेल. प्रत्येक महिन्याला ५५ ते २०० रुपयांचे योगदान द्यावे लागेल. सदस्यांचे वय योगदानावर अवलंबून असते.

अशा प्रकारे पैसे कापले जाऊ शकतात | PM Kisan Mandhan Yojana

योजनेंतर्गत, सरकार दर वर्षी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते. त्याच वेळी, जर तुम्ही निवृत्तीवेतन योजनेत PM किसान मानधन (PMKMY) सहभागी झालात तर नोंदणी करणे सोपे होईल. दुसरे म्हणजे, जर तुम्ही हा पर्याय निवडला, तर पेन्शन योजनेत दरमहा कपात करावयाचे योगदानही या तीन हप्त्यांमधून कापले जाईल.

पात्र कोण आहेत?

  • लहान आणि सीमांत शेतकरी
  • दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असलेले शेतकरी
  • अर्जाचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे