Agriculture News : Youtube सध्या सर्वजण सोशल मीडियाचा (Social media) वापर मोठ्या प्रमाणात करतात. बरेच लोक सोशल मीडियाचा वापर करून अनेक गोष्टी शिकतात. सध्या हरियाणाच्या पलवलमध्ये राहणाऱ्या एका महिलेची सोशल मीडियावर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या महिलेने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून नैसर्गिकरित्या घरी भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. पत्नीच्या प्रेरणेने पतीनेही या कामात हात घातला आणि आज हे जोडपे इतर शेतकऱ्यांसाठी उदाहरण बनले आहे.
पलवलमधील एका छोट्या गावात राहणारे शैलेश कुमार सामान्य पद्धतीने शेती करायचे, ज्यामध्ये ते कीटकनाशके, औषधे आणि इतर खतांचा वापर करायचे. शेतातून उत्पादनही चांगले आले, यादरम्यान त्यांच्या पत्नीने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून नैसर्गिक पद्धतीने घरी खाण्यासाठी भाजीपाला पिकवण्याचा निर्णय घेतला आणि भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली. पत्नीची नैसर्गिक शेतीची (Natural farming) आवड पाहून शेतकरी शैलेश कुमार यांनीही नैसर्गिक शेती सुरू केली. (latest marathi news)
आज शैलेश आणि त्यांची पत्नी प्रगतीशील शेतकरी असून सुमारे 4 एकर क्षेत्रात नैसर्गिक शेती करत आहेत. शेतकरी शैलेश केवळ माणसांसाठीच नाही तर जनावरांनाही चारा मिळावा यासाठी नैसर्गिक शेती करत आहे. त्यांनी जनावरांसाठी लावलेला चाराही नैसर्गिकरित्या पिकवला आहे. Agriculture News
शैलेशने भोपळा, काकडी, भेंडी, कार्ले या भाज्यांची लागवड केली असून, आपण जी काही पिके घेतो ती पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने घेतली जाते, असे त्याने सांगितले. यामध्ये कोणत्याही प्रकारची कीटकनाशके, औषधे, खतांचा वापर होत नाही. खत नैसर्गिकरित्या शेतातच तयार केले जाते आणि तेच पिकावर फवारले जाते. असे त्यांनी सांगितले आहे