Cow Milk Rate : बरेच शेतकरी (Farmer) शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन (animal husbandry) हा व्यवसाय करतात. हा व्यवसाय केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. मात्र आता या व्यवसायामध्ये देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा होत असल्याचे दिसत आहे. मागच्या काही दिवसापासून दूध दराबाबत ( Milk Rate) मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. दरम्यान यामध्येच आता राज्य सरकारकडून दुधाचा किमान दर ३४ रुपये निश्चित करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, आता या दराबाबत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण की, पशुखाद्यांच्या किंमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचबरोबर रोगराईमुळे गायीचा 34 रूपये दर हा शेतकऱ्याला परवडणारा नसल्याचे बोलल जात आहे. सध्याच्या घडीचा जर विचार केला तर 40 ते 45 रुपये प्रति लिटर दूध हा परवडू शकतो असे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र सध्याची स्थिती पाहता सरकारने जो दर निश्चित केला आहे. तो दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे बोलले जात आहे यावरून अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. ३.५ फॅट व ८.० एसएनएफ असलेल्या दुधाला किमान ४० रुपये दर द्यावा अशी दूध उत्पादक शेतकरी मागणी करत आहेत. (Cow Milk Rate )
पशूंची खरेदी विक्री कुठे करणार?
शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या पशूंची खरेदी-विक्री घरबसल्या करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक सोपी गोष्ट करायची आहे. तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करायचे आहे. यामध्ये तुम्हाला पशूंची खरेदी विक्री त्याचबरोबर सरकारी योजना, बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, रोपवाटिकांची माहिती व अन्य कृषी विषयक माहिती मिळेल ती ही अगदी मोफत. त्यामुळे आजच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करा