Agriculture News : माती परीक्षण आणि बीज संशोधनावर भर द्या; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना

Agriculture News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project) संदर्भात मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान बद्दलण्याची शक्ती आहे त्यासाठी ती जास्त प्रभावी पद्धतीने राबविण्याची गरज आहे. माती परिक्षणाची कामे कृषी विद्यापीठांकडून वेळोवेळी करून त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी पोस्टाची मदत घेण्यात येईल. असे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

त्याचबरोबर बदलत्या वातावरणानुसार अधिक प्रभावी व उत्पन्नवर्धक ठरतील अशी बियाणे निर्मिती करण्यासाठी बियाणे संशोधनाची प्रक्रिया गतिमान करण्यात यावी, अशाही सूचना देखील धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी यावेळी दिल्या आहेत. (Agriculture News)

कृषी विद्यापीठांमार्फत माती परिक्षण करण्याबाबतचा निर्णय घेणार

सध्याच्या हवामानाचा विचार केला तर हवामान सतत बदलत आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या उद्धवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि त्यानुसार पिकाचे उत्पादन घेण्यासंदर्भात त्याचबरोबर बीज निर्मिती प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत माती परिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांना पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पाठविण्याची सुविधाही संबंधित विभागाशी चर्चा करून उपलब्ध देण्यात येणार आहे. त्याचबरोबर. शेतकऱ्यांची मागणी आणि प्रतिसाद विचारात घेऊन आवश्यकता भासल्यास विद्यापीठामधील माती परिक्षण केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात येईल, असेही कृषिमंत्री धनंजय मंत्रीमुंडे यांनी सांगितलं.