Fertilizer And Seed Business | आता केवळ 10वी पास सुद्धा करू शकतात खत आणि बियाणांचा व्यवसाय, करावा लागणार ‘हा’ कोर्स

Fertilizer And Seed Business | मित्रांनो आजकाल अनेक शेतकरी हे शेतीसोबत अनेक व्यवसाय देखील सुरू करण्यात असतात. त्यातल्या त्यात कीटकनाशके, खते, बियाणे हा व्यवसाय अनेक शेतकऱ्यांना खूप फायदा ठरतो. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. या आधी सरकारने केलेल्या नियमानुसार अनेक बंधनासोबत तुम्हाला हा व्यवसाय सुरू करून शकत होता. परंतु आता सरकारचे नवीन नियमानुसार कृषी विषयात पदवी घेतलेल्या तसेच दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांनाच आता कीटक नाशके, खते बियाण्यांचे दुकान उघडण्याचा परवाना मिळू शकतो.

तुम्हाला जर कमीत कमी गुंतवणूक करून हा व्यवसाय करायचा असेल तर कृषी क्षेत्र तुमच्यासाठी चांगली आहे. तुम्हाला जर खते बी बियाण्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अगदी काही लाखांमध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला आधी परवाना मिळवणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला हा परवाना मिळाल्यावर तुम्ही तुमच्या गावात देखील खत आणि बी बियाण्याचे दुकान उघडू शकता. परंतु आता परवाना मिळवण्यासाठी सरकारने अटी घातले आहेत म्हणजेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोर्स करावा लागणार आहे.

हेही वाचा- Sandalwood Farming | चंदनाची शेती आहे फायदेशीर व्यवसाय, केवळ 50 झाडं 15 वर्षात बनवतील करोडपती!

किमान दहावी पास असणे गरजेचे | Fertilizer And Seed Business

खत बी बियाणे यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सगळ्यात आधी तो व्यक्ती किमान दहावी पास असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही दहावी पास नसाल तर तुम्ही खत आणि बियाण्यांची दुकान उघडू शकत नाही. याआधी कीटकनाशके खते आणि बियाणे यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बीएससी कृषी किंवा कृषी पदविका गरजेचे होते. जर तुमच्याकडे ही पदवी नसेल तर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येणार नाही. ही बंधने आता कृषी व शेतकरी कल्याण विभागाने बंद केली आहे. आता केवळ दहावी उत्तीर्ण असलेले लोक देखील कीटकनाशके खत बी बियाणे यांचा व्यवसाय सुरू करू शकतात.

परवाना मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज

सरकारने केलेले नवीन नियमानुसार आता अनेक लोक हा व्यवसाय सुरू करू शकतात. नवीन नियमानुसार कृषी विभागात बी येत असेल. दहावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना बी बियाणे यांचे दुकान उघडण्याचा परवाना मिळू शकतो. त्यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्रातून पंधरा दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करावा लागेल. हा अभ्यासक्रम पूर्ण होताच एक चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळतात तुम्ही परवानासाठी अर्ज करू शकता.