Havaman Andaj : मागच्या चार पाच दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. नदी नाल्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. त्या ठिकाणी सर्वच भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे. तर शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने रविवारी म्हणजेच आज राज्यातील १४ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारीकेला असून काही ठिकाणी यलो अलर्ट जरी केला आहे. पुणे परिसरातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरु आहे. यावेळी पुणे शहरात मात्र पावसाची प्रतिक्षा आहे. पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसरामध्ये मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. मात्र शहरात अजूनम्हणावा असा पाऊस नाहीच. (Havaman Andaj )
पुण्यामध्ये दिवसभरात अवघ्या एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुण्यात 53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र घाटमाथा परिसरामध्ये तुफान पाऊस होत आहे. दरम्यान राज्यात पावसाचा जोर पुढील चार दिवस कायम राहणार आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.