IMD Alert : कोकणात ढगफुटीसारखा पाऊस होणार? पुणे जिल्ह्यातही रेड अलर्ट, पहा तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज

IMD Alert : मागच्या तीन चार दिवसापासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाने राज्यात अक्षरश थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होतोय. यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

शनिवारी म्हणजेच आज हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अन् यलो अलर्ट जरी केला आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसाच्या पार्शवभूमीवर अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे राज्यात पेरण्या खोळंबल्या होत्या मात्र आता राज्यात आतापर्यंत ७८ टक्के पेरण्या झाल्या आहेत.(IMD Alert)

दरम्यान, आज पुणे हवामान विभागाने आज पुन्हा रेड अलर्ट दिला आहे. पालघर, सातारा, ठाणे पुणे आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, रत्नागिरी, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आणि इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.