Kesar Farm| टेक्नॉलॉजिचा वापर करून इंजिनिअरने केली महाराष्ट्रात केशराची शेती, पाहा पद्धत

Kesar Farm | मित्रांनो आजपर्यंत आपण ऐकले आहे आणि पाहिले देखील आहे की, फक्त काश्मीरमध्येच केशर या पिकाची शेती होती. परंतु आता महाराष्ट्रामध्ये देखील ही शेती होणार आहे. महाराष्ट्र मधील नंदुरबार या ठिकाणी गरम हवेच्या वातावरणात एका कॉम्प्युटर इंजिनिअरने टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन केशर पिकवण्यात यश मिळवले आहे

नंदुरबार येथे राहणाऱ्या हर्ष मनीष पाटील हा एक इंजिनियर आहे. त्यांनी डी वाय पाटील कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी आपल्या वडिलांना पारंपारिक पद्धतीने शेती करताना पाहिले आहे. आणि त्यातीलच एक वेगळा पर्याय म्हणून त्यांनी हा विचार केला आहे. त्याने सगळ्या येणाऱ्या अडचणीचा सामना केला आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे ही शेती पिकवली आहे.

हेही वाचा –Winter Crops | हिवाळ्यात करा ‘या’ भाज्यांची लागवड, चार महिन्यातच व्हाल श्रीमंत

केसरिया पिकासाठी थंड हवामान खूप आवश्यक असते. अशावेळी या मुलाने जवळपास पंधरा बाय पंधरा एका रूममध्ये सेटअप तयार केला आहे. त्या घरामध्ये त्याने एसीची व्यवस्था केली आहे. त्याने मोगरा केसर आणले आहे. केसरची शेती केल्याने तेथील वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी त्याने पूर्ण त्याच्या रूमला थर्माकोल चिटकवले आहे. त्याने ते केसर उगवण्यासाठी एक पूरक वातावरण तयार केले आहे. हे मोगरा केसर जवळपास एक हजार रुपये प्रति किलो आहे.

हे सगळे करण्यासाठी त्याला जवळपास पाच लाख रुपये खर्च आला. एक केसरचे बी लावल्यावर जवळपास तीन ते चार केसर उगवतात. ते जवळपास दहा वर्षापर्यंत चालू राहते. त्यांनी जवळपास अडीच ते तीन महिन्यांमध्ये हा प्रयोग पूर्ण केला आहे. आणि महाराष्ट्रमध्ये केशरची शेती केली आहे.