Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुढील 5 दिवस या भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा नवीन अंदाज पहा

Maharashtra Weather Update : आपण पाहिले चार ते पाच दिवसापासून हवामानात काहीसा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात तापमानात थोडी घट झाली होती. त्यामुळे थोडी वर थंडीची चाहूल सगळ्यांनाच लागलेली होती. परंतु गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यात तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी सकाळी जरी थंडी वाजली तरी दुपारनंतर उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात बसत आहेत.

जळगाव झाले महाबळेश्वर

असे असले तरी काही भागात मात्र मोठ्या प्रमाणात तापमानात घट झालेले दिसत आहे. आपण जरा जळगाव बद्दल जाणून घेतले तर जळगावमध्ये किमान तापमानात घट झाली आहे. महाबळेश्वरसारखी थंडी जळगावात पाहायला मिळत आहे.

त्यामुळे राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहिला मिळत आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस येण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

शेतकरी मित्रानो, तुमच्या गावात पाऊस पडणार कि नाही हे जाणून घेण्यासाठी आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्हाला सलग ४ दिवसांचा हवामान अंदाज अचूकपणे समजतो. तसेच सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, पशु- खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकट मध्ये मिळत आहे. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि सर्व सुविधांचा लाभ घ्या

यावर्षी कमी पावसाची नोंद

आपण यावर्षी पाहिले तर दरवर्षी मान्याने सरासरी यावर्षी खूप कमी पाऊस पडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत 12 टक्के पाऊस कमी पडला आहे.

अनेक भागात दुष्काळ जाहीर

राज्यात यावर्षी केवळ 88 टक्के पाऊस पडलेला आहे. त्यामुळे आत्ताच राज्यातील बहुतेक ठिकाणी आपल्याला दुष्काळासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमधील जवळपास 40 तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे शासनाने या भागात दुष्काळ देखील जाहीर केलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.

हेही वाचा – PM Kisan Mandhan Yojana | सरकारतर्फे मिळणार दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन, जाणून घ्या योजनेची माहिती

दुष्काळी परिस्थितीत खरीप हंगाम खराब झाला आहे. त्याबरोबर आता रब्बी हंगाम देखील खराब होण्याची शक्यता आहे म्हणून अवकाळी पाऊस बरसला पाहिजे असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.

या भागात पडणार पाऊस

आता आपण पाहिले तर केरळच्या समुद्रावर अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक अशी परिस्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे कोकणमधील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर तसेच गोव्यातील काही भागात पुढील दोन दिवस हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.