Marathi News : सध्या देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी तर दुकानदारांनी टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाउन्सर ठेवल्याचे आपल्याला पहिला मिळाले. टोमॅटोचे दर वाढल्यापासून टोमॅटोची सतत चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही फक्त टोमॅटोची हवा दिसत आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ तसे मिम्स सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, हे सर्व असतानाच आता एक धक्कादायक घटना घडली आहे.
आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात एका टोमॅटो शेतकऱ्याची लुटण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेम राजशेखर रेड्डी (62) यांची बुधवारी मदनपल्ले मंडलातील बोडीमल्लादिन गावात हत्या झाली आहे. (Marathi News)
त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, काही लोक टोमॅटो खरी करायचे आहेत असे सांगत शेतात आले होते. मात्र पती घरी नाही असं सांगितल्यास ते निघून गेले. या शेतकऱ्याचे नुकतेच कृषी बाजारात टोमॅटो विकून 30 लाख रुपये आले होते. त्यामुळे हे पैसे लुटण्याच्या हेतून ही हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आता या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)