Poultry Farming | कुकुटपालन व्यवसायासाठी सरकारकडून मिळणार आर्थिक मदत, महिन्याला कमाऊ शकता 20 हजार

Poultry Farming |आजकाल बाजारामध्ये चिकन आणि अंडी यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन हा जोड व्यवसाय एक चांगला जोड व्यवसाय मानला जातो. या व्यवसायातून तुम्ही दर महिन्याला अतिरिक्त 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत कमाई सुरू करू शकता. तुम्हाला जरी आता हा पोल्ट्री व्यवसाय सुरू करणार असल्याचा विचार करत असाल, तर तो तुम्ही नक्की करू शकता. कारण आता पोल्ट्री उभारण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत देखील केली जाते.

दरवर्षी होणार चांगली कमाई | Poultry Farming

कोंबड्या या एक वर्षाला कमीत कमी दीडशे ते अडीचशे अंडी देतात. त्याचप्रमाणे नवीन कोंबड्या देखील पाच ते सहा महिन्यात अंडी द्यायला सुरुवात करतात. अशा प्रकारे तुम्ही पोल्ट्री चालू करून कोंबड्यांच्या पालन करू शकता. दर वर्षाला यातून तुम्हाला खूप चांगली कमाई देखील मिळेल आणि बाजारात देखील खूप चांगला भाव सुरू होईल.

बाजारात पिल कोंबड्यांच्या पिल्लांना 35 ते 40 रुपये एवढा भाव आहे. जर तुम्ही तुमचा नवीन बिजनेस सुरू करण्यासाठी शंभर पिल्ले खरेदी केली, तर तुम्हाला जवळपास तीन हजार रुपये खर्च होईल. त्यानंतर या पिल्लांचे पालन पोषण करून जेव्हा त्या मोठ्या कोंबड्या होतात. तेव्हा मार्केटमध्ये त्यांची किंमत खूप चांगली वाढते. प्रत्येक कोंबडीची किंमत जवळपास 500 रुपये एवढी असते. अशा प्रकारे तुम्ही दर महिन्याला वीस कोंबड्या विकू शकता. आणि दर महिन्याला दहा हजार रुपये तुमची कमीत कमी होईल. या व्यतिरिक्त त्यांची अंडी विकून तुम्ही जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये कमी करू शकता. अशाप्रकारे तुम्ही जर कुकूटपालन हा व्यवसाय केला तर वीस हजारापेक्षा जास्त रुपये तुम्ही दर महिन्याला करू शकतात.

हेही वाचा – Kisan Rin Portal केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिवाळीसाठी शेतकऱ्यांना दिली मोठी भेट, ‘ही’ योजना करणार सुरू

जास्त जागेची आवश्यकता नाही

तुम्हाला कुक्कुटपालन हा व्यवसाय अशा ठिकाणी सुरू करायचा आहे, जिथे जास्त गर्दी नसेल. जर तुम्ही दीडशे कोंबड्यांचे पालन करत असाल, तर तुम्हाला जवळपास दीडशे ते दोनशे फूट जमिनीची गरज पडेल. तुम्ही जी जागा निवडणार आहात, ती अत्यंत साफ असली पाहिजे. तसेच सुरक्षित देखील असली पाहिजे. जेणेकरून कोंबड्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही.

कोणत्या जातीच्या कोंबड्या फायदेशीर

तुम्हाला कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला चांगल्या जातीच्या कोंबड्या निवडणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून त्या तुम्हाला त्यातून खूप चांगला फायदा होईल. या बिझनेसमध्ये जास्त तीन जातीच्या कोंबड्या पाडल्या जातात. लेयर, बॉयलर आणि देसी या कोंबड्यांचे मांस आणि अंडी दोन्ही बाजारात खूप चांगल्या प्रकारे विकले जाते.

नाबार्ड कडून मिळणार कर्ज

व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला नाबार्ड आणि ग्रामीण विकास बँकेमधून कर्ज देखील दिले जाते. या व्यतिरिक्त तुम्हाला पोल्ट्री फार्मची ट्रेनिंग देखील तुमच्या जवळच्या सरकारी संस्था नाहीतर लाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मिळेल. तुम्ही तिथे जाऊन ऑनलाईन अर्ज देखील करू शकता.