Poultry Farming : भारतात सर्वात जास्त लोक हे शेती (agriculture) व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीतून जास्त नफा मिळत नसल्याने बरेच शेतकरी (Farmer) आता शेतीसोबत जोडव्यवसाय देखील करतात. शेतकरी आता पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करण्यास जास्त प्राधान्य देतात. हा असा व्यवसाय आहे जो सुरू करण्यासाठी करोडो रुपयांची गरज नाही. अवघ्या काही लाख रुपयांमध्ये पोल्ट्री फार्म (Poultry farm) व्यवसाय सुरू करता येतो. विशेष म्हणजे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय खेड्यात, ग्रामीण भागात, शहरांमध्ये आणि अगदी महानगरांमध्येही सुरू करता येतो, कारण चिकनची मागणी सर्वत्र आहे. त्यामुळे या व्यसायामधून चांगला नफा देखील मिळतो. (Latest Marathi News)
बरेच लोक वेगेवेगळ्या जातीच्या कोंबड्या पाळून पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करतात. मात्र पोल्ट्री फार्मशी संबंधित लोकांनी जर कडकनाथ कोंबडी पाळण्यास सुरुवात केली तर ते अधिक कमाई करू शकतात. कडकनाथ कोंबडी (Kadkanath Chicken) खूप महाग आहे. एका अंड्याची किंमत 50 रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचे मांस 1000 रुपये किलोने विकले जाते. त्यामुळे यामध्ये चांगली कमाई होऊ शकते. Poultry Farming
दिल्ली, मुंबई, कोलकाता या महानगरांमध्ये कडकनाथ चिकनची मागणी हळूहळू वाढत आहे. अशा परिस्थितीत कडकनाथ कोंबडीचे संगोपन केल्यास सामान्य कोंबडीच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळेल. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही कडकनाथ कोंबडी पाळतो. त्यांचा रांचीमध्ये कडकनाथ कोंबडीचा खूप मोठा पोल्ट्री फार्म आहे.
कडकनाथमध्ये देसी चिकनच्या तुलनेत २५% पेक्षा जास्त प्रथिने आहेत (Poultry Farming)
कडकनाथ कोंबडी पाळण्यासाठी तुम्हाला पोल्ट्री फार्म उघडायचा असेल तर तुम्हाला किमान 150 चौरस फूट जागा लागेल. शेड बनवून तुम्ही या जागेत सुमारे 100 कडकनाथ पिलांची काळजी घेऊ शकता. ही पिल्ले 5 महिन्यांत विक्रीसाठी पूर्णपणे तयार होतील. सध्या बाजारात कडकनाथ कोंबडीचे मांस 800 ते 1000 रुपये किलोने विकले जात आहे. एका अंड्याची किंमत 50 रुपयांपेक्षा जास्त आहे. कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय सुरू करून तुम्ही 5 महिन्यांनंतर लाखो रुपये कमवू शकता. कडकनाथमध्ये देसी चिकनच्या तुलनेत २५% पेक्षा जास्त प्रथिने असतात.