Sarkari Yojana : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) पशुसंवर्धनाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी (Farmer) महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नंद बाबा मिशन सुरू केले आहे. या अभियानांतर्गत गायींच्या खरेदीवर गायींचे पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) आता याचा मोठा फायदा होणार आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने हे अभियान सुरू केले आहे. यासोबतच हे अभियान सुरू झाल्याने राज्यात दुधाचे उत्पादनही वाढणार असून, त्याचाही फायदा राज्य सरकारला होणार आहे. देशी जातीच्या गायींची संख्या वाढवण्यासाठी नंद बाबा मिशन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर अधिक दूध देणाऱ्या देशी जातीच्या गायी खरेदी कराव्या लागणार आहेत. (Latest Marathi News)
या अभियानामुळे राज्यात देशी जातीच्या गायींची संख्या वाढेल, असा सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे. यासोबतच लोकांची पशुपालनाची आवड वाढेल. अशा परिस्थितीत रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या गुरांची संख्या कमी होऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल.असं देखील सरकारचा विश्वास आहे.
शेतकऱ्यांना होणार मोठी मदत
विशेष म्हणजे हे अनुदान जास्तीत जास्त दोन देशी गायी खरेदीवरच दिले जाणार आहे. उत्तर प्रदेशचे दूध आयुक्त आणि नंद बाबा मिशनचे मिशन डायरेक्टर, शशी भूषण लाल सुशील म्हणतात की, या योजनेमुळे राज्यातील दूध उत्पादन वाढेल, कारण शेतकऱ्यांना अधिक दूध देणाऱ्या गायींच्या संगोपनावर भर दिला जात आहे.
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, इतर राज्यातून गायी खरेदीवर शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 40,000 रुपये अनुदान म्हणून दिले जाईल. विशेष म्हणजे गायींचा 3 वर्षांचा विमाही काढला जाणार आहे.