Success Story : टोमॅटोमुळे शेतकरी झाला मालामाल! दिवसाला तब्बल 18 लाख रुपयांची कमाई

Success Story : सध्या सगळीकडे टोमॅटोच्या दाराचीच चर्चा चालू आहे. दररोज टोमॅटो संबंधी काहीतरी नवीन माहिती समोर येत आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये लाखो रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे टोमॅटो दरवाढीचा फायदा अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. दरम्यान आता या दरवाढीचा फायदा जुन्नरमधील एका शेतकऱ्याला झाला असून हा शेतकरी चक्क कोट्यधीश झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

तुकाराम गायकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. गायकर हे पाचघर गावचे रहिवाशी आहेत. पाचघर हे पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं गाव आहे. तुकाराम गायकर यांच्याकडे जवळपास 18 एकर बागायती शेती आहे. यामधील 12 एकरमध्ये तुकाराम गायकर यांनी मुलगा ईश्वर आणि सून सोनालीच्या मदतीने टोमॅटोची लागवड केली होती. यामुळे आता त्यांना याचा चांगलाच फायदा झाला आहे. (Tomato Rate )

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दररोजचे ताजे बाजारभाव जाणून घ्यायचे आहेत तर मग वाट कशाची पाहताय? लगेच प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही रोजचा बाजारभाव चेक करू शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअरला जाऊन आपले Hello Krushi हे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करा.

Download Hello Krushi Mobile App

टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने गायकर कुटुंबाला जणू लॉटरीचं लागली आहे. महिन्याभरात या 12 एकरामधून त्यांना तब्ब्ल सव्वा कोटीहून अधिक रुपयांचं उत्पादन मिळालं आहे. त्यामुळे सध्या त्यांची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. सध्याच्या नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये क्रेटला 2100 रुपयांचा दर मिळतोय. गायकर यांनी 11 जुलैला 900 कॅरेटची विक्री केली. त्यामुळे मंगळवारी या कुटुंबाला जवळ्पास 18 लाख रुपये मिळाले आहेत.

तस पाहिलं गेलं तर फक्त गायकर कुटुंबच नव्हे तर अनेक कुटुंबांनी टोमॅटोमधून करोडो रुपयांची कमाई केली आहे. शेतकऱ्यांना टोमॅटो दर वाढीमुळे मोठा फायदा होत आहे मात्र शहरी भागातील लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.