Success Story : काळानुसार शेतीही आधुनिक झाली आहे. बरेच शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करून शेती करत आहेत. शेतीची पद्धत सोपी व्हावी आणि उत्पन्न वाढावे यासाठी नवनवीन यंत्रे व तंत्रे शोधली जात आहेत. सध्या शेतकरी बाकी उत्पादनापेक्षा फळांची आणि फुलांची लागवड करण्यास प्राधान्य देत आहे. या पिकातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे वाढतच चालला आहे. (Agriculture News)
देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून फुले आणि फळांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. बलवीर सरन या शेतकऱ्याने देखील यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शेती केली आहे. हा शेतकरी राजस्थानमधील नागौर येथील कटिया गावचा रहिवासी आहे. (Success Story)
या शेतकऱ्याने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शेती सुरू केली आहे. विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्याने डाळिंब, कोरफड, नेपियार गवत आणि बिझारो लिंबू पिके लावली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीनेशेती केली आहे त्यामुळे या शेतकऱ्याची नागौर जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी म्हणून गणना होते
याबाबत बलवीर सरन हा शेतकरी सांगतो की, ” मी जेव्हा शेती करायला सुरुवात केली तेव्हा मला विश्वासच बसला नव्हता की मी इतके चांगले कमावेन आणि मी दूरवर प्रसिद्ध होईल. मात्र जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे फळबागांमध्ये यश मिळाले असे शेतकरी म्हणाला आहे. आज तो एक यशस्वी शेतकरी बनला आहे.
फळांचे बाजारभाव कुठे पाहणार?
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रोजचे बाजारभाव पाहायचे असतील तर तुम्ही आजच hello krushi हे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही रोज बाजारभाव चेक करू शकता. त्याचबरोबर जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री, हवामान अंदाज, सरकारी योजना इत्यादी गोष्टींची माहिती पाहू शकता ते ही अगदी मोफत त्यामुळे लगेचच हे अँप डाउनलोड करा