Viral Video | शेतकऱ्याने अनोख्या अंदाजाने केली दुधी भोपळ्याची शेती, पाहा शेतकऱ्याचे जुगाड

Viral Video | आपले सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना सुरू करत असतात. यातीलच एक योजना म्हणजे शेततळे योजना. ही योजना सरकारने काही वर्षांपूर्वी शेअर केली आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. या शेततळ्यात उतरण्यासाठी शेतकरी एक अनोखे वाहन तयार करतो आणि दुधी भोपळा काढताना दिसत आहे.

ओडिसामधील सुंदरगड जिल्ह्यातील दंगल पाली या एका गावात शेतकऱ्यांनी शेततळ्यावर दुधी भोपळ्याची लागवड केलेली दिसत आहेत. त्याचप्रमाणे हा दुधी भोपळा काढून घेण्यासाठी त्यांनी एक चांगलीच युक्ती देखील केलेली आहे. शेतकऱ्याने चार छोटे छोटे ड्रम आणि त्यावर एक स्टॅन्ड तसेचर पत्रा लावला आहे. तसेच एक खास छोटे वाहन देखील तयार करतो. आणि त्यावर जाऊन बसून हे वाहन पाहण्यात तरंग जाते. आणि त्यावर बसून शेतकरी शेत तळ्यावरील दुधी भोपळा एकेक करून काढून घेतो अशाप्रकारे शेतकऱ्यांनी हा जुगाड केलेला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, शेतकरी अनोख्या पद्धतीने दुधीभोपळा काढताना दिसत आहे. ओडिसाचे आयएएस अधिकारी अरविंद पाधी यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याचप्रमाणे कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “ओरिसामधील सुंदरगड जिल्ह्यातील तरंगपाली गावातील या शेततळ्यात भाजीपाल्यासह बांधाची शेती वाढवणे हे एक अद्भुत दृश्य आहे इजीएस आणि राज्य मोफत अंतर्गत आमचे प्राथमिक उद्दिष्ट शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देणे हा आहे.”

हेही वाचा- Weather Update | या राज्यांमध्ये 28 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडेल, जाणून घ्या तुमच्या शहराचे हवामान

त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि व्हिडिओ पाहून त्या शेतकऱ्याची कौतुक देखील होताना दिसत आहे.